उमरगा (लक्ष्‍मण पवार) -:  येथील जिल्‍हा सत्र व अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयात व तालुका विधी सेवा समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय लोक न्‍यायालयात विविध प्रकारच्‍या 385 प्रकरणांचा निपटारा शनिवार दि. 23 नोव्‍हेंबर रोजी करण्‍यात आला.
    या लोक न्‍यायालयाचे उदघाटन जिल्‍हा सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधिश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्‍यक्ष स.ला. पठाण यांनी केले. यावेळी न्‍यायाधीश एल.एस. येनकर, एच.एस. मुल्‍ला, विद्याधर मोरे, व्‍ही.पी. केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या लोकन्‍यायालयात मोटार अपघाताचे चार प्रकरणे, फौजदारी स्‍वरुपाचे दोन प्रकरणे, चेक बाउन्‍सचे 118 पैकी 55 प्रकरणे, दिवाणी 146 पैकी 35 प्रकरणे, फौजदारीचे 68 पैकी 12 प्रकरणे, दावापूर्व प्रकरणे, भारतीय स्‍टेट बँकेचे 34 प्रकरणे, हैद्राबाद बँकेचे 47 प्रकरणे निकाली काढण्‍यात आले. प्रथमच बँकाचे 85 प्रकरणे, भारत संचार निगमचे 247, फौजदारीचे 12, दिवाणी स्‍तरचे 35 व मोटार अपघाताचे 6 असे 385 प्रकरणांचा निपटारा तीन बेंचच्‍या माध्‍यमातून एकाच दिवसात करण्‍यात आला.
    या सर्व प्रकरणात शासकीय अभियोक्‍ता व्‍ही.एस. आळंगे, श्रीमती. एस.ए. पोतदार, अँड. ए.व्‍ही. जाधव, अँड. एस.पी. इनामदार, अँड. बी.एस. राजोळे, अँड. एस.एम. देशपांडे, अँड. पी.आर. देशपांडे, अँड. एस.के. घोडके, अँड. एम.पी. शेख, अँड. वाय.बी. जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. या लोक न्‍यायालय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अँड. एस.एम. देशपांडे यांनी मानले.
    आपसातील भांडण तंटे मिटवून सलोख्‍याचे नातेसंबंध जोपासत सामाजिक व आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्‍हा सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधिश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्‍यक्ष स.ला. पठाण यांनी लोकन्‍यायालयात मार्गदर्शन केले.
 
Top