बार्शी -: ना. दिलीप सोपल यांना पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाल्यानंतर बार्शीतील कित्येक वर्षांचा धुळखात पडलेला स्वच्छता व पाणी पुरवठ्याचा प्रश्न 89 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मंजुरीने निकाली निघाला आहे. मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदरचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
विरोधी बाकावर बसलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी देखील आजपर्यंत अनेक कामांना विरोध केला असला तरी विधायक कामाची प्रशंसा करत आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान योजनेंतर्गत बार्शी शहरातील हायड्रोलिक मॉडेलिंग जीआयएस मॅपींग तसेच एनर्जी ऑडीटचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार शहरातील सर्व ईएसआरचे झोनिंग तयार करण्यात आले असून नवीन विस्तारित भागासाठी वितरण व्यवस्था करणे व शहरात असलेल्या जुन्या झालेल्या पाईपलाईन बदलणे, त्याच्या पाईपच्या साईजचे मॉडीफिकेशन करणे, लोकसंख्या व झोननुसार नवीन उंच टाक्या बांधणे, उजनी जलाशयातून येणा-या पाण्याच्या शुध्दीकरण केंद्रात सुधारण करणे, चांदणी योजनेच्या उदभवातील हेडवर्कमधील पंपींग मशिनरी बदलणे, 24 बाय पाणीपुरवठा करण्याच्या वॉटर ऑडीटचा अंतिम अहवाल मंजूर करणे, सुधारणात्मक कामांच्या अहवालात शिफारस करण्यात आलेल्या कामांचे अंदाजपत्रक 73.28 कोटी इतके सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले आहे.
याचबरोबर शहरातील तीर्थ क्षेत्रामुळे भाविकांच्या संख्येतील वाढ, लोकसंख्येतील वाढ विचारात घेऊन विविध ठिकाणी पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्याने शहरातील विविध 65 ठिकाणी महिला व पुरुषांचे एकूण 1515 सीटचे आधुनिक सेफ्टी शौचालये बांधण्याचे 16.35 कोटी रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यालाही सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या दोन्ही कामांसाठी एकूण 89.63 कोटी रुपयांचे काम होत असून याकरीता शासकीय अनुदान 80 टक्के, लोकवर्गणी 10 टक्के व न.पा.ने कर्ज स्वरुपात 10 टक्के उभे करुन सदरचे काम करण्यात येणार आहे.
(मल्लिकार्जून धारुरकर)