नळदुर्ग : शिकाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणा-या शिकाई असोसिएशन महाराष्ट्र व शिकाई असोसिएशन यांच्या वतीने गोवा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्य पद शिकाई मार्शल आर्ट स्पर्धा 2013 मध्ये नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील रहिवाशी व शाहू कॉलेज लातूरची विद्यार्थीनी कु. सुचेता विरभद्र स्वामी हिने 19 वर्ष वयोगटातून रौप्य पदक पटकावले.
गोवा येथील स्पोर्ट क्लब फोंडा येथे नुकत्याच पार पाडलेल्या राष्ट्रीय अजिंक्य पद शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातून व 50 किलो वजन गटामधून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कु. सुचेता विरभद्र स्वामी हिने राष्ट्रीय स्तरावर दितीय क्रमांक मिळविला. सुचेता यास उस्मानाबाद जिल्हा शिकाई असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, संगिता पवार, धनराज पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सुचेता स्वामी हिचे सावली बचत गट अणदुरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दयानंद काळूंके सौ. संगिता गायकवाड, मारूती बनसोडे,प्रा. पांडुरंग पोळे, भैरवनाथ कानाडे, आर. एस. गायकवाड, प्रा. विरभद्र स्वामी, नेताजी क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.