उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळामार्फत सन 2012 च्या चालक (कनिष्ठ) पदाच्या भरतीअंतर्गत वाहन चालन चाचणीमध्ये 50 टक्के  व जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या 929 उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
     महामंडळाच्या मुंबई प्रदेशातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या विभागात चालक पदाची नितांत आवश्यकता लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एम. के. सी. एल. पुणे यांच्या www.msrtc.mkcl.org या संकेत स्थळावर नावे असलेल्या व  इच्छुक  उमेदवारांनी प्रादेशिक व्यवस्थापक, रा. प. मुंबई  प्रदेश, कुर्ला -किरोल रोड, विद्याविहार, मुंबई-86 येथे  दि. 6 डिसेंबर 2013 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, रा.प. उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top