
या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 1. विचार निर्मल महाराष्ट्राचा प्रवास आव्हानाचा, 2. जोश तरुणाईचा,जागर स्वच्छतेचा, 3. शुध्द पाणी पिण्याचे आरोग्य सांभाळी गावाचे, 4.माझा स्वप्नातील स्वच्छ निर्मल गाव 5. आपल पाणी आपली योजना हे विषय आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 1. राखू पाण्याची गुणवत्ता, मिळेल आरोग्याची सुबत्ता, 2.लोकसहभाग गावाचा-आधार पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा, 3. तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती, 4. मी निर्मल गावचा ग्रामसेवक बोलतोय,5. स्वच्छतेतुन-समृध्दीकडे असे विषय असल्याची माहिती उस्मानाबादचे गट विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या स्पर्धेसाठी दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार बक्षिस देण्यात येणार आहे. तालुकास्तरीवरील प्रथम दोन क्रमांक हे जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी पंचायत समिती, उस्मानाबाद किंवा संपूर्ण स्वच्छता अभियान कक्ष जिल्हा परिषद, उस्मानाबादशी सपर्क साधावा. संपर्कासाठी भ्रमणध्वनी श्री. तायडे एस. डी. 9404531860, श्री. कळसाईत एस. एस. 9420475633, श्री. राठोड एन. एस. 9623798090, श्री. पटेल जे.एन. 9623313343, श्री. मेदणे एस. डी-9011863950 , पंचायत समिती कार्यालय, उस्मानाबाद 02472-222157 वर संपर्क साधावा.