उस्मानाबाद :- जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2011-12 ते 2013-14 या कालावधीसाठी पशुसंवर्धन प्रथमोपचार केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने इमारती परीरक्षण दुरुस्ती, कुक्कुट योजना आणि कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत विविध विकास कामे हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॅा. शीतलकुमार मुकणे यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन प्रथमोपचार केंद्र बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सन 2011-12 साठी 208 लाख 50 लाख इतका निधी प्राप्त झाला. यात बेंबळी, जळकोट, तलमोड, येरमाळा, शोळगाव, सोनारी, तांदुळवाडी, कानेगाव अशा 9 ठिकाणची कामे पूर्ण करण्यात आली. सन 2012-13 साठी 375 लाख इतका निधी प्राप्त झाला. यामध्ये उपळा, काजळा, ढोकी, सावरगाव, पिंपळा खु., दहिफळ, ईटकूर, चिंचपूर, पारा, पागाव अशा 10 ठिकाणी बिगर निवासी दवाखान्यांचे काम करण्यात आले तर बेंबळी, उपळा, सावरगाव, तलमोड, ईटकूर, पिंपळा अशा 6 ठिकाणच्या निवासी दवाखान्यांची कामे करण्यात आली. सन 2013-14 साठी पशुवैद्यकीय दवाखाने इमारती परीरक्षण दुरुस्ती बांधकामासाठी सन 2011-12 साठी 102 लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. यात येडशी, वाघोली, तेर, अंबेजवळगा, कोंड, ताकविकी, केशेगाव, पाटोदा, नळदुर्ग, सलगरा म., माळुंब्रा, सिंदफळ, मसला, बारुळ, अपसिंगा, काटी, मंगळूर, तीर्थ खुर्द, आरळी बु., काटगाव, अणदूर, बेडगा, कसगी, जेवळी, वालवड, वरुड, ईट, पाथ्रुड, आंबी, आष्ठा, आनाळा, वाकडी याठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची कामे घेण्यात आली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत परसातील कुक्कुट योजनेत सन 2011-12 मध्ये 60 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. यात शेडची दुरुस्ती करणे, नवीन शेड तयार करणे, अटोमेटीक वाटरर व फिडररची कामे घेण्यात आली.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सन 2011-12 साठी 25.925 लाख निधी प्राप्त झाला. यामध्ये 17 गावांची निवड करण्यात आली. सन 2012-13 मध्ये 61 लाख रुपये निधी प्राप्त झाला. यांत 40 गावांची निवड करण्यात आली. सन 2013-14 साठी 154 लाख इतका निधी प्राप्त झाला असून 101 गावांची निवड त्यामध्ये करण्यात आली असल्याचे डॅा. मुकणे यांनी कळविले आहे.