कळंब (बालाजी जाधव) -: येथील जुन्या मंडई रोडवरील सर्वे नं 108 मधील आरक्षीत जागेवरील बावीस दुकानावर कळंब नगर परिषदेनणे बुलडोजर फिरवून अतिक्रमण काढण्यात आले.
कळंब शहरातील भाजी मंडई रोड वर अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांनी आपली दुकान मांडली होती. संबधितांना नगरपालिकेने वेळोवेळी नोटीसा बजावून आपली दुकान उठवा अशी विनंती देखिल केली पण सत्ताधारी पक्षाला विरोध करत अनेक राजकीय नाटयमय घडामोडीत दि. 27 रोजी नगरपालिकेने या सर्वे नं. 108 मधील 28 दुकानातील 22 दुकाने पाडू जागा साफ करण्यात आली. उर्वरित सहा दुकानांनी न्यायालयात गेल्यामुळे हे दुकान अजून पाडली नाहीत.
या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगरपालिकेचे मुख्याधिका-यासह कर्मचारी उपस्थित होते. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके, सय्यद सह पोलीस कर्मचारी, बारा महिला पोलीस कर्मचारी ,दंगल निवारण पथकातील आठ कर्मचारी असा तगडा बंदीबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.
या सर्वे नं. 108 मधील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत शहरात मागील काही महिन्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून यात बनावट दस्तावेज तयार करून या जागेची मालकी हक्क दाखवण्याचा दोघाजणांवर 420 चा गुन्हा दाखल झाला असून त्यांना कळंब पोलीसांनी अटक देखील केली आहे. या जागेवर शॉपींग सेंटर होणार असून वरील मजल्यावर भाजी मंडई देखील होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी दिली. नगर पालिका प्रशासनाने सध्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात सपाटा लावला असून या सर्वे नं. 108 बरोबरच जुने पोलीस स्टेशनच्या पाठीमागील शेटे गल्लीत देखील जवळपास चाळीस कुटुबांनी अतिक्रमण करून घरे बांधले असून त्याठिकाणी देखिल अतिक्रमण उठवण्यात येणार असून यामध्ये देखील काही राजकीय विरोधी पक्ष आक्षेप करत असून या अतिक्रमणाकडे सर्व शहरवासियांचे सध्या लक्ष लागले आहे.