
कांही गावांची वेगळी ओळख म्हणुन त्या गावांना घरजावयांचे गाव, मुक्यांचे गाव, भै-यांचे गाव अंधाचे गाव, अपंगाचे गाव अशा ओळखीवरून गावाच्या ओळखी ठरू लागतात. मात्र दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या व पिवळ सोन हळद पिक, ऊत्पादनात कधी काळी अग्रस्थानी असलेल्या पांढरी गावाची मात्र तंदरूस्त गाव अशी नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. या गावातील लोकांमध्ये अपंग, मुकबधिर अशा प्रकारच्या व्यंगाच्या माणसाची कल्पनाच अलिकडील काळात नामशेष होऊ लागली आहे. पुर्वी प्रत्येक गावात विविध प्रकारच्या आजारामुळे व अन्य अनुवंशिक कारणामुळे अपंगांची संख्या लक्षणीय असायची.
वाचनप्रिय लोकांची संख्या लक्षणीयः
डोंगरी भागात रहाणा-या व घावटी नावाचा अपभ्रंश होऊन बहुसंख्य लोकांची घावटे ही आडनावे पुढे आलेल्या पांढरी गावाचे एक वेगळेपण पुढे येऊ लागलेले आहे.या गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत साधारणतः 75 ते 80 टक्के ग्रामस्थ हे दैनंदिन देशात, जगात व समाजात काय घडामोडी घडतात याची उत्सुक्ता लागलेले आहेत. गावातील वाचनालयात वर्तमानपत्र पोचण्याच्या अगोदरच कित्येकजण हे वाचनालयासमोर येऊन वर्तमानपत्राची उत्सुक्तेने वाट पहात बसतात. यातुन डोंगरी भागात राहुनही जगाच्या घडामोडीविषयी येथील जनतेला किती कुतुहल आहे हे निदर्शनास येते. या छोटयाश्या गावातील अनेक तरूणांनी शिक्षणाच्या माध्यमातुन आपल्या कतृत्वाची पताका फडवली आहे. या छोटयाश्या गावातील काही होतकरू तरूणांनी पुण्यासारख्या माणसांच्या जंगलात जावुन र्निमिर्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अवैध धंदामुक्त गांव
पांढरी गावाची एक वेगळी ओळख म्हणजे या गावात अणेक वर्षांपासुन आजपर्यंत एकही दारूधंदा अथवा अवैध व्यवसाय अस्तित्वातच नाही. आजकाल कोणतेही छोटे-मोठे गाव दारूसह अनेक प्रकारच्या अवैध धंदयांनी वेढलेले आपणास पहावयास मिळते. काही वेळेस वृत्तपत्रांमधुन गावांविषयी नकारात्मक स्वरूपात बातम्या झळकत असतात. मात्र पांढरीसारखी काही अपवादात्मक ठरत असलेल्या गावांविषयी सकारात्मक माहिती लोकांसमोर जाणे गरजेचे असते.
शेकडो वर्षांपुर्वीचे वडाच्या झाडाचा इतिहास
पांढरी गांवात प्रवेश करण्यापुर्वीच शेकडो वर्षांपासुन अस्तित्वात असलेला व जवळपास एक एकर विस्तीर्ण क्षेत्रावर आपली शितल अशी छाया सावली पसरून उन्हाळयासह सर्वच ऋतुमध्ये ग्रामस्थांना मायेची व बुजुर्गपणाची साथ देणारा वृक्ष आज मोठया दिमाखात उभा आहे. या वडाच्या वृक्षांच्या शेंडयाला जाणे म्हणजे जिवावर उदार होऊनच अशा प्रकारचे असुन गावातील जेमतेम तिनजणच वडाच्या शेंडयाला जावु शकतात असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. काही वर्षांपुर्वी या वडाच्या झाडावर झेंडे लावण्याच्या किरकोळ कारणावरून संपुर्ण पांढरी ग्रामस्थांना पोलिस ठाण्याची हवा खावी लागली होती व झेंडयाचे प्रकरण पांढरीपासुन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंत चांगलेच गाजलेही होते. हा अपवाद वगळता संपुर्ण गावात शांतता अबाधित आहे.