उस्मानाबाद :- जिल्हा रुग्णाल्याच्यावतीने पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जनजागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय खुल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलगी वाचवा देश वाचवा कार्यक्रमांतर्गत दि. 30 नोव्हेंबर रोजी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशेाक धाकतोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
स्त्री भ्रुण हत्येसारख्या विषयाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अशा प्रथांना पायबंद घालण्यासाठी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय येथे दि. 5 डिसेंबर रोजी स. 11 ते दु.12 यावेळेत येथील परिचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुगणालय, उस्मानाबाद निबंध स्पर्धा घेण्यात येतील. या स्पर्धेचे विषय 1.स्त्री भ्रण हत्या समस्या व उपाय, 2.लेक वाचवा, 3.सोनोग्राफी केंद आणि घटती मुलींची संख्या हे आहेत. याच ठिकाणी दु. 1 ते 4 या वेळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील. या स्पर्धेचे विषय 1. स्त्री भुण हत्या- सामाजिक अभिशाप, 2. स्त्री भ्रण हत्येस जबाबदार कोण- डॉक्टर की समाज, 3.पीसीपीएनडीटी कायदा व स्त्री भ्रुण हत्या हे विषय आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 5 रोजीच सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
या सर्व जनजागृतीपर कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. धाकतोडे, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.स.) डॅा. टी. एच. माने, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे केले आहे.