उस्मानाबाद :- ज्या माजी सैनिकांनी 1914 ते 1919 या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुध्दात भाग घेतला आहे, अशा शूरवीर सैनिकांची तसेच त्यांच्या वारसांची माहिती संकलित करण्यात येत आहे. सदर माजी सैनिक मयत झाले असेल तर त्यांची विधवा पत्नी किंवा त्यांचे हयात वारसानी सैनिकाचे डिसजार्च पुस्तकबुक, सैनिक हयात नसेल तर मृत्युचा दाखला,आर्थिक मदत मिळत असल्यास त्याचा तपशिल व इतर सैन्य सेवेचे पुरावे घेवून तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर ( नि ) सुभाष सासने यांनी केले आहे.
 
Top