उस्मानाबाद :- बेंबळी पोलीस स्टेशनअंतर्गत मौ. वाडी (बा.) शेत गट क्र 205 मधील शेतात / शिवारात 30 ते 35 वयोगटातील  पुरुष जातीचे बेवारस व्यक्ति मृत पावला असून अद्याप त्या प्रेताची ओळख पटलेली नाही.  यासंदर्भात कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी बेंबळी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      सदर बेवारस इसमाची उंची-160 से.मी, शरीर बांधा-मजबुत, नाक-जाड, रंग-काळा सावळा, छातीवर उजव्या बाजुस तीळ, पोषाख-चॉकलेटी रंगाचा लहान डिझाईनचा शर्ट व कॉटन जीनची गजग्या रंगाची आहे. कमरेस लाल करडोदा व गळ्यात काळा कडदोरा आहे. सदर इसम मरणापुर्वी वाडी (बा.) शिवारात पायात चप्पल न घालता सतत फिरत असे त्यास मराठी किंवा हिंदी भाषा बोलता  येत नव्हती. तो कन्नड भाषा बोलत असल्याचे स्थानिकांनी सांगितल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
     इसमाचे प्रेत शासकीय रुगणालय, उस्मानाबाद येथे ठेवण्यात आले आहे. त्याच्या शोधासाठी अद्यापही कोणीही वारस अथवा घरातील व्यक्ती किंवा पालक यांनी प्रत्यक्ष येऊन भेट किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधलेला नाही. याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, बेंबळी, दुरध्वनी क्रमांक 02472-235033, सहा. पोलिस निरीक्षक एम. बी. जाधव यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422132399 संपर्क साधावा.   
 
Top