उस्मानाबाद :- कु. कामाक्षी (वय अंदाजे 5 ते 6) आणि  कु. नंदिनी (वय अंदाजे 12 ते 14) या मुली बेवारस रित्या आढळून आल्या आहेत. त्यांना स्वआधार बालगृह, उस्मानाबाद येथे ठेवण्यात आल्या आहेत. यातील कु. कामाक्षी ही पुणे-बीड या बसमध्ये चालक व वाहकास एस.टी डेपेात दिसून आल्याने तिला शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. सदर  मुलीस स्वधार मतिमंद बालगृहात 18 ऑक्टोबर, 2013 पासून दाखल करण्यात आले आहे.
         तसेच कु. नंदिनी ही मुलगी  27 ऑक्टोबर रोजी स. 11-30 वाजता दुरक्षेत्र मादळमोही येथे पत्रकार चंद्रकांत हक्कदार यांना ही बेवारस मुलगी राष्ट्रीय महामार्ग क्र 222 वर पेट्रोलपंपाजवळ रस्त्यालगत दिसून  आल्याने पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, गेवराई यांनी ताब्यात घेवून  सदर  मुलीस तुळजाई  प्रतिष्ठाण बहु. संस्था पानगाव संचलित स्वधार मतिमंद बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
       या अनाथ मुलींच्या  पालकांची शोध मोहिम सुरु आहे. या मुलीबाबत तुळजाई प्रतिष्ठान बहु. संस्था पानगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, उस्मानाबाद  भ्रमणध्वनी क्रमांक 9423767524/ 9595096283, दुरध्वनी क्र. 02472-228876 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उस्मानाबादचे स्वआधार मतिमंद मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षकांनी केले आहे.
 
Top