कळंब -: खामसवाडी (ता. कळंब) येथील महाविद्यालयीन युवतीवर बलात्‍कार करुन तिला पेटवून दिल्‍याप्रकरणी एका आरोपीस अंबेजोगाई येथे पोलीसांनी ताब्‍यात घेऊन अटक केली. आरोपीस न्‍यायालयासमोर बुधवार रोजी हजर केले असता दि. 3 डिसेंबर पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहे.
       फुलचंद गोराबा कोल्‍हे असे पोलीस कोठडी मिळालेल्‍या आरोपीचे नाव आहे. यातील गंभीर जखमी झालेली युवती मोहेकर महाविद्यालय कळंब येथे बी.ए. प्रथम वर्षात‍ शिक्षण घेत असून ती कळंब येथील इंदिरानगरमध्‍ये खोली भाड्याने करुन राहते. ती दि. 24 नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता गावाकडे जाण्‍यासाठी कळंब बसस्थानकाकडे जात असताना फुलचंद कोल्‍हे व त्‍याचा एक सोबती अनोळखी मुलगा मोटारसायकलवर येऊन त्‍या मुलीस तिला जबरदस्‍तीने मोटारसायकलीवर बसवून तिच्‍या तोंडावर हात ठेवून या दोघांनी तिला येरमाळा रोडवरील शिवाजी नगरमधील खोलीवर नेले. तेथे तिला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करुन तिच्‍यावर बलात्‍कार केला. यावेळी मोबाईलने फोटो काढले. त्‍यानंतर कोल्‍हे याने तु माझ्याशी लग्‍न कर नाहीतर मी तुझी बदनामी करीन, असे म्‍हणाला. तेंव्‍हा तिने लग्‍नास नकार दिला. एवढेच नव्‍हे तर आरोपीने रात्रभर तिला लग्‍न कर म्‍हणून मारहाण करुन त्रास दिले. दि. 25 नोव्‍हेंबर रोजी सकाळी अत्‍याचारित युवतीस घरी जाऊ दिले नाही. पुन्‍हा आरोपीने यावेळी लग्‍न का करत नाहीस, म्‍हणून अंगावर रॉकेल टाकून जिवे मारण्‍याच्‍या हेतून काडी ओढून पेटवून दिले. त्‍यात ती गंभीर जखमी झाली असून अंबेजोगाई येथील रुग्‍णालयात उपचार घेत असून याप्रकरणी कळंब पोलिसात गंभीर जखमी युवतीच्‍या पित्‍याने तक्रार दिल्‍यावरुन आरोपीविरुध्‍द गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. आरोपीस अंबेजोगाई येथून अटक करुन न्‍यायालयासमोर हजर केले असता दि. 3 डिसेंबर पोलीस कोठडीत ठेवण्‍यात आदेश न्‍यायालयाने दिले आहे. पुढील तपास जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे   यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी.एल. सावळे हे करीत आहेत.
 
Top