उमरगा (लक्ष्‍मण पवार) -:  राष्‍ट्रीय बाल विज्ञान परिषद अंतर्गत ऊर्जा शोध संरक्षण व संशोधन आणि संवर्धन या विषयांर्गत मुत्रविर्सजनापासून विजनिर्मिती करण्‍याबाबतचा विज्ञान प्रयोगाची राज्‍यस्‍तरावर निवड झाल्‍याचे पत्र जिजामाता प्राथमिक शाळेला नुकतेच मिळाले आहे.
      पुणे येथिल राष्‍ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या विभागीयस्‍तरीय विज्ञानप्रदर्शनात मुत्रविर्सजनापासुन वीजनिर्मिती प्रकल्‍पाचे सादरीकरण जिजामाता प्राथमिक शाळेतील जवाद पटेल, अनिल स्‍वामी, कु.मंजुषा जाधव, आठवीतील महिदा शेख यानी उत्‍क्ररष्‍टरित्‍या सादर केले.त्‍या प्रयोगाची राज्‍यस्‍तरावर निवड झाल्‍याचे कळविण्‍यात आले आहे.
    जिजामाता प्राथमिक शाळेची विभागस्‍तरावरून राज्‍यस्‍तरावर निवड झाल्‍याबद्दल माजी आ. प्रा. रविंद्र गायकवाड कृ.ऊ.बा.समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, आ. ज्ञानराज चौघुले, गटशिक्षाणाधिकारी सौ सुधाबाई साळुंके, शिक्षण विस्‍तार  अधिकारी बिराजदार, संस्‍थाध्‍यक्ष कमलाकर पाटील,  मुख्‍याध्‍यापीका श्रीमती के.एस.पाटील. विज्ञान शिक्षक  ज्ञानेश्‍वर सांगवे, श्रीमती पी.एम जवळगेकर. आर. एस पौळ, एन.एन पवार, ए.बी. राठोड, पी.पी. टेकाळे, एम.व्‍ही. स्‍वामी, आय. एच. बनसोडे, आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top