उस्मानाबाद :- एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियान 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाबाबत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना माहिती व्हावी यासाठी शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.