उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: शहरातील राष्‍ट्रीय महामार्गालगत असलेले पालिका अंतर्गत येणारे अतिक्रमण तात्‍काळ काढावेत, या मागणीसाठी स्‍वाभिमानी संघटनेने बेमुदत आमरण उपोषणास बुधवार दि. 27 नोव्‍हेंबर पासून नगरपालिकेसमोर सुरुवात केली आहे.
        नगरपालिका मुख्‍याधिका-यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, शहरात गेल्‍या अनेक वर्षापासून शासकीय बारा बंगले ते डॉ. महाजन यांच्‍या दवाखान्‍यापर्यंतचे अतिक्रमण रहदारीस अडथळा निर्माण करत असताना सुध्‍दा पालिकेने अद्याप अतिक्रमण काढले नाही. परंतु नव्‍याने बांधकामाचे  अतिक्रमण काढले जात नाही. सदरचे बांधकाम व शहराच्‍या दृष्‍टीने बारा बंगल्‍यापासून महाजन दवाखान्‍यापर्यंतचे सर्व अतिक्रमण तात्‍काळ काढावेत, यासह शहरातील सर्वच ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्‍ते अतिक्रमण मुक्‍त करावे, या मागणीकरीता स्‍वाभिमान संघटनेचे जिल्‍हाउपाध्‍यक्ष भास्‍कर जाधव, अमर चाटे, सुभाष कांबळे, परमेश्‍वर जमादार, अविनाश शिंदे, बालाजी पवार, दिनेश कासुदे यांच्‍यासह पदाधिकारी बेमुदत  आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी स्‍वाभिमानचे जिल्‍हाध्‍यक्ष किरण टेकाळे, कळंबचे प्रकाश भोसले, संदीप हलचलमल यांनी भेट दिली.
 
Top