तुळजापूर -: पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अणदूर येथील संपर्क कार्यालयातील चोरी प्रकरणातील चार आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथे अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अणदूर येथील कार्यालयात चोरी झाली होती. याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील मधुकर चव्हाण, संजय चव्हाण, प्रवीण सरडे, गोविंद काळे (सर्व रा. मार्डी) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळून लॅपटॉप व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी सांगितले आहे.