पांगरी (गणेश गोडसे) :- बालाघाट पर्वतरांगांवर घोंगावणा-या पवनउर्जा प्रकल्पाच्या संदर्भात तुळजापूर लाईव्हने निर्भिड व सडेतोड शब्दात सलग वृत्तमालीका प्रसिध्द करून पवन उर्जा प्रकल्प व त्याचे भविष्यात या भागातील जनता शेतकरी यांना भोगावे लागणारे परिणाम याविषयी स्पष्ठपणे लिखान केल्यामुळे पांगरी परिसरासह सोलापुर उस्मानाबाद जिल्हयातील बालाघाट पर्वतरांगांच्या पटयात येणा-या शेतक-यांमध्ये जनजागृती होऊ लागली असुन सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गातुन याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सतत कोणत्यातरी विषयावर चर्चेत रहाणारे दोन्ही जिल्हयातील राजकारणी मात्र या विषयावर बघ्याची भुमिका घेऊन थांबा आणि पहाचीच भुमिका घेत असल्याचे शेतक-यांमधुन उघडपणे बोलले जात आहे. जो राजकारणी बालाघाट पर्वतरांगांमधील पवनउर्जा प्रकल्पाच्या प्रश्नात हस्तक्षेप करून आवाज उठवेल त्यांना निश्चीतच या भागातील जनता डोक्यावर घेतल्याशिवाय रहाणार नाही, अशी एकंदर परिस्थती या भागात आहे. मात्र सध्यातरी या गंभिर विषयामुळे या पटयातील जनता भयभीत झाल्याचे दिसत आहे. पवनउर्जा प्रकल्पामुळे विज, रोजगार यामध्ये व जमिनीच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे एरव्ही सतत आंदोलन करून स्वतःला शेतक-यांचे कैवारी असल्याचा दिखावा निर्माण करणा-या विविध शेतकरी संघटना व राजकारणी सध्या या प्रश्नावर ताठर भुमिका का घेत नाहीत. याविषयी पुढे येण्यास कोणीच कसे तयार होत नाही. ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारक आहे. झळ बसणा-या कांही शेतक-यांच्या बोलक्या प्रतिक्रिया.

किशोर सातनाक (शेतकरी पांगरी) -: आमच्या शेतजमीनी हया बालाघाट पर्वतरांगांच्या पटयालगत येत असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा आम्हाला बसणार असुन यासाठी या भागातील सर्वपक्षीय संघटना व शेतक-यांनी आंदोलन करण्याची गरज आहे.
सतिश जाधव (शेतकरी पांगरी) -: बालाघाट पर्वतरांगाच्या पटयातील शेतक-यांच्या मानगुटावर बसु पहात असलेले पवनउर्जा प्रकल्पाचे भुत वेळीच हाकलुन देणे गरजेचे ठरणार असुन त्यासाठी शेतक.यांना संघटीत करून आम्ही त्यासंदर्भात संबंधीत कार्यालयांना रितसर तक्रारी अर्ज देणार असुन तरीही त्याची दखल न घेतल्यास या परिसरातील शेतक-यांना घेऊन आंदोलन छोडले जार्इल.
आबासाहेब मुंढे (शेतकरी उक्कडगांव) -: बालाघाट पर्वतरांगांवर होत असलेले पवनउर्जा र्निर्मितीचे प्रकल्प या भागातील शेतक-यांवर खुप मोठे संकट असणार असुन यामुळे या भागातील पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी कंगाल होणार आहे.
किरण मुळे (शेतकरी उक्कडगांव) -: पवनउर्जा प्रकल्पांमधुन तयार होणारी विज या भागातील शेतक-यांना अत्यल्प दरात उपलब्ध झाल्यास या भागातील शेतक-यांसाठी एक पर्वनीच ठरणार असुन मात्र वितरण कंपनीपेक्षा जादा दराने कंपन्यांनी विज देण्याचा निर्णय घेतल्यास ही बाब शेतक.-च्या दृष्टीने हितावह ठरणार नाही.
किरण पवार (शेतकरी चिंचोली) -: सोलापुर जिल्हयातील सांगोला तालुक्यासह शेजारील सातारा सांगली व कराड या भागातील पर्जन्यमान पवनउर्जा प्रकल्पांमुळे घटल्याचे दाखले समोर असल्यामुळे व आता हेच लोन बालाघाट पर्वतरांगावर पोचल्यामुळे आधिच अत्यल्प पर्जन्यमानाचा भाग असलेल्या या परिसरात शेतीचे काय हा मोठा प्रश्न सध्या डोक्यात घोंगावत आहे. यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडणार असुन शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.
सिदधेश्वर शिंदे (शेतकरी चिंचोली) -: शेतीव्यवसायाकडे पाठ फिरवलेला शेतकरी पुन्हा कसेतरी शेतीकडे वळु लागला असुन तशात या भागातील शेतीला वाळवंट करण्यास उपयुक्त ठरणारा पवनउर्जा प्रकल्प या भागात स्थिरावत असल्यामुळे हे शेती व शेतकरी या दोघांच्या मुळावर येणार आहे. शेतक-यांचे अस्तीत्व संपुष्ठात येणार आहे.
स्वप्नील काळे (शेतकरी) आधिच सलग पडत असलेल्या दुष्काळामुळे पुरते कंभरडे मोडलेल्या शेतक-यांना स्थलांतर करून जगण्यासाठी गांव सोडण्याची वेळ येणार आहे. या भागात पाऊसच पडला नाही तर कसे जगायचे जनावरे कशी जगवायची शेती कशी करायची असे एक ना अनेक प्रश्न या भागातील शेतक-यांना भेडसावणार आहेत. यासाठी तरूणांनी पुढाकार घेऊन याविरूदध आवाज उठवुन आलेले संकट पळवणे गरजेचे आहे.
बाबा जाधव (शेतकरी पांगरी) -: या भागातील शेतकरी सर्वसामान्य जनता यांची एकत्रीत मोट बांधुन या विषयावर कांहीतरी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.कोणीतरी पुढे होऊन याची जबाबदारी उचलने गरजेचे असुन ते मात्र घडताना दिसत नाही. पवनचक्यांना संघटीतपणे विरोध करणे ही काळाची गरज ठरणार आहे. तो निर्णय आत्ताच घेणेही खुप गरजेचे आहे.
किरण घावटे (शेतकरी पांढरी) -: उर्जा स्तोत्राचा वापर होणे गरजेचे असुन सध्याच्या वाढत्या उर्जेची गरज लक्षात घेता सदर प्रकल्प योग्य असुन त्यातुन तयार होणारी उर्जा स्थानिक शेतकरी व नागरिकांना दिली तरच हा प्रकल्पांचा या भागातील लोकांना फायदा होईल.