सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवून भारताचे संविधानाचे जाहिर वाचन करुन भारतीय राज्यघटनेचा सन्मान केला जाणार आहे असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी कळविले आहे.