सोलापूर :- बचत गटातील महिलांनी कायमस्वरुपी राहणा-या वस्तु निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर येथील होम मैदानावर आयोजित ' दख्ख्नन जत्रा 2013 ' या पुणे विभागीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, आ. सिद्रामप्पा पाटील, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, कृषी सभापती जालिंदर लांडे, महिला व बाल कल्याण सभापती जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, विभागीय विकास उपायुक्त इंद्रजित देशमुख आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव उपस्थित होते.
या उद्घटनाप्रसंगी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, ' दख्खन जत्रा ' सारख्या प्रदर्शनाद्वारे बचत गटांना आपल्या उत्पादीत वस्तु विक्री करण्याची चांगली संधी मिळते. याचा फायदा बचत गटांनी घेतला पाहिजे. केवळ विभागस्तरावरच नव्हे तर राज्यस्तर व राज्याबाहेरही त्यांनी आपला बचत गट उत्पादीत माल विक्रीसाठी नेला पाहिजे. हा माल परदेशातही विक्री व्हावा यासाठी बचत गटांनी केवळ खाद्यपदार्थ तयार न करता कायमस्वरुपी राहणा-या वस्तु निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे असेही ते म्हणाले.
राज्य सरकारकडुन दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना दारिद्रयरेषेच्या वर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कृतीशील कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. याचा परिणाम काही दिवसात सामान्य माणसाच्या प्रत्येक घरात झालेला दिसून येईल. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला उपजीवीकेचे साधन निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून याआधारे संपूर्ण कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे. याद्वारे निर्माण झालेल्या बचत गटांचा संघ तयार करण्यात येणार आहे.
या बचत गटाच्या संघांना मदतीसाठी तालुका व जिल्हास्तरावर बचत गट फेडरेशन निर्माण केल्या जात असून या फेडरेशन अंतर्गत बँकाद्वारे कर्ज उपलब्ध करुन देणे, कर्जाची परतफेड करणे इ. गोष्टी केल्या जाणार आहेत त्यामूळे बचत गट आणि बॅकांची एक चांगली लिंक तयार होणार आहे. आता इंटरनेटच्या माध्यमातून बेबसाईटद्वारे राज्यातील बचत गट उत्पादीत वस्तुंची विक्री करण्यात येणार असून या बेबसाईटची जाहिरात सरकारी खर्चातुन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 10 जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सोलापूर जिल्ह्याचा समावेश असून याचे चांगले कामही जिल्ह्यात चालु असल्याबदृल समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामविकास मंत्र्याच्या हस्ते जिल्ह्यातील बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
डॉ. माळी आपल्या भाषणात म्हणाल्या की, बचत गटांच्या माध्यमाद्वारे महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहात आहेत. स्वावलंबातून समृध्दीकडे जाण्याबरोबरच हे बचत गट ग्रामीण अर्थव्यवस्थाही प्रवाहीत करीत आहेत. बचत गटांमूळे महिलांची आर्थिक पत उंचावली आहे. बचत गटांना कर्ज मिळविण्यासाठी बॅकांची क्लिष्ठ प्रक्रिया पार पाडावी लागते. ती सुलभ करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन बचत गटांनी सेवा व्यवसायातही पदार्पण करावे असे आवाहन केले.
श्रीमती गायकवाड यांनी महिला बचत गट उत्पादीत वस्तुंना ब्रॅण्डींग व कायमस्वरुपी विक्री केंद्रे निर्माण करुन द्यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कासार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्र. संचालक प्रभु जाधव यांनी केले.