पंढरपूर :- सध्या साखर कारखानदारी अर्थिक गर्तेत सापडली आहे. ऊस दराबाबत तसेच कारखानदारी टिकवण्यसाठी समन्वयाची, सामंज्यस्याची भूमिका आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी केले.
माळीनगर (अकलूज) येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी प्रा.लि.येथील अष्टदशक पुर्ती सोहळा व 14.8 मेगा वॅट सहवीज निर्मीती प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते.
साखर निर्यातीला केंद्राचा पाठींबा असेल. कृषी संबंधित इतर व्यवसायाची प्रगती व्हावी यासाठी केंद्रातर्फे सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून श्री पवार पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य द्यावे.तसेच शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी जनमत तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राज्याला दुष्काळ निवारण्यासाठी सुमारे 950 कोटी रुपये दिल्याचेही ना. पवार यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, सहकारी चळवळी मुळेच राज्यातील शेतकरी ताठ मानेने उभा आहे. नियमित कर्ज परत फेड करणा-या शेतक-याला बँकानी कर्ज द्यावे तसेच कारखानदारांनीही अर्थिक शिस्त पाळावी असा सल्लाही श्री.भूजबळ यांनी याप्रसंगी दिला, तर ऊस दरा बाबत विविध संघटनांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यावी. भावनिक अतिरेक टाळावा असे आवाहन, राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
यंदा राज्यात 80 लाख मेट्रीक टन इतके साखरेचे उत्पादन होईल, त्यापैकी 25 ते 30 लाख मेट्रीक टन साखर निर्यातीला केंद्राने अनुदान द्यावे अशी मागणी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.यावेळी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.तत्पूर्वी प्रा.कविता मुरुमकर लिखित 'मी सावित्री जोतीराव ' या कांदबरीचे प्रकाशन केंद्रीय कृषीमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, राजेंद्र गिरमे यांनी तर आभार प्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष विलास इनामके यांनी केले.यावेळी माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, प्रा.लक्ष्मण ढोबळे,सिद्धराम म्हेत्रे, बाळासाहेब शिवरकर, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, भारतनाना भालके, दिपक आबा सांळुखे पाटील, हनुमंत डोळस, माजी आ.सुधाकरपंत परिचारक, राजन पाटील, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, कृष्णाकांत कुदळे, वसंतराव ताम्हाणे, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद आणि अकलूज पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काखाना साईटवरील सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटनापूर्वी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी महाळुंग येथील कल्पतरु नीरा उत्पादक नीरा उत्पादक सहकारी संस्थेस भेट देवून तेथील 12 एकरच्या परिसरात लावण्यात आलेल्या नीरेच्या झाडांची पहाणी करुन संबंधिताकडून माहिती जाणून घेतली.