पांगरी : भरधाव वेगात निघालेल्या टाटा मॅजीकने एसटी बसला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दि.10 नोव्‍हेंबर रोजी मध्यरात्री पुणे-लातुर राज्यमार्गावर निलकंठेश्‍वर मंदिराजवळ घडली.
    रमाकांत मारूती श्रीरामराव (वय 43, रा.नांदेड) असे अपघातात गंभिर जखमी झालेल्या एसटी चालकाचे नांव आहे. जखमी बसचालक श्रीरामराव यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे की, ते त्यांच्या ताब्यातील एम एच 20 बि.एल.2226 ही बस नांदेडहुन कोल्हापुरकडे घेऊन जात असताना रात्री साडे बारा वाजण्‍याच्या सुमारास बार्शीहुन येडशीकडे जाणा-या एमएच 06 बि.ई.453 या टाटा मॅजिकच्या चालकाने बसला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. चालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.
(गणेश गोडसे)
 
Top