पांगरी :- इंडीका व दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि.11 नोव्‍हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्‍याच्या सुमारास उस्मानाबाद-बार्शी मार्गावर तांदुळवाडी गावाजवळील फॉरेस्टजवळ घडली.
    विकास अभिमान गंभीर (वय 26 रा.कारी, ता.बार्शी) असे अपघातात गंभिर जखमी झालेल्याचे नांव आहे. विजकुमार अभिमान गंभीर (वय 28, रा.कारी, ता.बार्शी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, जखमी विकास गंभीर हा एम एच 13 व्ही 4294 हया दुचाकीवरून बार्शीहुन कारीला जात असताना उस्मानाबादहुन बार्शीकडे भरधाव वेगात निघालेल्या बिगर नंबरच्या अज्ञात इंडीका कारची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जखमी विकास गंभीर याच्यावर बार्शीच्या जगदाळे मामा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडीका चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. विजयकुमार गंभीर यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्‍यात आला असुन अधिक तपास हवालदार बिराजदार हे करत आहेत.
(गणेश गोडसे)
 
Top