उस्मानाबाद -: प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपिक विमा योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी आंबा फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे.सदर योजने अंतर्गत सन 2013- 14 हंगामात आंबा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतक-यांना व बिगर कर्जदार शेतक-यांना दि. 31 डिसेबर 2013 ही आहे. शेतक-यांनी आंबा पिकासाठी सहा हजार रुपये प्रति हेक्टरी रक्कम बँकेत भरुन संरक्षीत करावे.
      तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन एस. एम. तोटावार यांनी केले आहे. शेतक-यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी/ मंडळ कृषि अधिकारी/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा. 
 
Top