पांगरी -: स्वस्त धान्य दुकानातुन धान्याच्या गोण्‍या चोरून नेऊन तेरा हजार रूपयाचे नुकसान झाल्याची घटना भोयरे (ता. बार्शी)येथे उघडकीस आली आहे.
    हनुमंत नवनाथ गात (रा. भोयरे, ता. बार्शी) या स्वस्त धान्य दुकानदाराने पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. हनुमंत गात यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शासकीय धान्य गोडावुनमधुन वाटण्‍यारसाठी आणुन ठेवलेले तांदळाचे 32 कट्टे अज्ञात चोरटयांनी दुकान फोडुन चोरून नेले आहेत. एका रात्रीत स्वस्त धान्य दुकानातुन 32 कटटे चोरून नेल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली असुन कटटे खरेच चोरटयांनी चोरून नेले का अन्य कोणी याबाबात लोकांमधुन उलटसुलट बोलले जात आहे. स्वस्त धान्य दुकानाची तपासणी मोहिम सुरू असतानाच चोरी झाल्यामुळे ग्राहकांमधुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. गात यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात अज्ञात चोरटयांविरूदध गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
 
Top