पांगरी -: शेताकडे जाणा-या रस्त्यावर खडडा खोदल्याच्या कारणावरून तिघांनी मिळुन एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभिर जखमी केल्याची घटना मळेगांव (ता. बार्शी) येथे मंगळवार रोजी सायंकाळी घडली.
    जगन्नाथ विठोबा वाघ (वय 40) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नांव आहे. विलास लक्ष्मण गडसिंग, संतोष लक्ष्मण गडसिंग व श्रीमंत लक्ष्मण गडसिंग असे काठीहल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
    जगन्नाथ वाघ यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गट क्रमांक 547 मध्ये खडडा खोदला असता आरोपींनी संगनमत करून रस्त्यावर खडडा का खोदलास कोर्टात दावा चालु आहे असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली. वाघ यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्‍यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
 
Top