कळंब (बालाजी जाधव) :- महाराष्‍ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्‍यावतीने महाराष्‍ट्र राज्‍य या सोशल संघटनेच्‍या माध्‍यमातून निर्माण झालेली 'कर्तव्‍यदक्ष दर्पण' या स्‍मरिणकेचे जिलहा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
    यावेळी बोलताना सचिन पाटील म्‍हणाले, आजपर्यंत जिल्‍ह्यात महाराष्‍ट्र पोलीस मित्र सोशल या संघटनेकडून पोलीस व नागरीक यांच्‍यात समन्‍वय निर्माण करण्‍याचा जो प्रयत्‍न केला आहे, तो कौतुकापस्‍द आहे. यापुढेही समाजातील वाढती गुन्‍हेगारी थांबविण्‍यासाठी नेहमी कटिबध्‍द राहावे, समाजात कायदा व सुव्‍यवस्‍था राखुन ठेवण्यासाठी प्रत्‍येक समाजसेवकांनी प्रयत्‍न केले आहेत, असे ते म्‍हणाले.
    यावेळी प्रदेशाध्‍यक्ष कमलाकर कोकीळ, संस्‍थापक सचिव सुफी सय्यद, सल्‍लागार शंकर बोराडे, संपर्कप्रमुख, शरद कावळे, कोषाध्‍यक्ष सुर्यकांत पंडीत, कळंब शहराध्‍यक्ष गणेश शेवते, कार्याध्‍यक्ष अमर तापडे, एजाज शेख, नितीन यादव, राहुल उमाप, आशिष कुंकुलोळ, संतोष सोनवणे, अशोक‍ क्षिरसागर, संजय आड यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top