संभाजी ब्रिगेडच्या बार्शी शाखेच्या वतीने सावळे सभागृह येथे महात्मा फुले यांचा स्मृतीदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी डोईफोडे हे बोलत होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद, देवा चव्हाण, विजय भोसले, चौरे, माळी, डॉ.राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना देवा चव्हाण म्हणाले, कर्मठ व सनातनी लोकांनी त्याकाळात महात्मा फुले यांच्या कार्याला विरोध केला परंतु कोणत्याही दबावाला न घाबरता त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामकुळेच आज बहुजन समाजातील स्त्रियांना बहुमान मिळत आहे. महात्मा फुले, सावित्री फुले यांच्या त्यागामुळेच आज स्त्रियांचे शिक्षण होत आहे.