पांगरी :- ट्रक व दुचाकीस्वार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-लातुर राज्यमार्गावर ढेंबरेवाडी गावानजिक घडली. अपघातानंतर ट्रकचालक पळुन गेला आहे आहे. पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रूग्णालयात दाखल करून वैदयकिय मदत दिली.
दिनकर अशोक सागाळे (वय 30, रा. हिसाबनगर, ता. देवणी, जि.लातुर) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव आहे. पुणे येथुन दिवाळीच्या सनासाठी आपल्या देवणी गावांकडे आपल्या दुचाकी (क्रमांक एम.एच 12 एफ.एच.587) वरून निघालेल्या दिनकर सागाळे यांची व लातुरहुन बार्शीकडे निघालेल्या क्रं. एम.एच.04 डी.डी.310 या मालवाहतुक करणा-या ट्रकची ढेंबरेवाडी गावाजवळील घाटात समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वारासह दुचाकीचे नुकसान झाले आहे. जखमी दुचाकीस्वारावर पांगरीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडुन पळुन गेला आहे.