तुळजापूर :- जळकोट ते हंगरगा (नळ) ता. तुळजापूर जाणा-या रस्‍त्‍यावर एका अज्ञात इसमाचा तिक्ष्ण हत्याराने निघृण खुन करून प्रेत रस्त्याच्या कडेला टाकल्याची घटना गुरुवार रोजी उघडकीस आली आहे.
   तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे दि. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी सकाळी ६.३० वाजता जळकोटपासून दिड किलोमिटर अंतरावर हंगरगा (नळ) रस्‍त्‍यावर  शिवाजी कदम  यांच्या शेताजवळ रस्‍त्‍याच्‍या बाजुला अनोळखी इसमाचे मृतदेह आढळले. याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी  सहका-यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथे दाखल केले. अनोळखी इसमास मारून मारेकरी फरार झाले आहेत. त्याचा खुन झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सदर इसमाचे वय ४५ असुन अंगात पांढरा टिशर्ट, मोरपंखी रंगाची जिन्स पॅन्ट असे वर्णन असुन या अनोळखी इसमास कोणी  ओळखत असेल तर त्‍यानी नळदुर्ग पोलिसाशी संपर्क साधाण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्‍ठा घाडगे- वालवलकर,  स्थानिक गुन्‍हा  शाखेचे पोलिस निरिक्षक माधवराव गुंडीले यांनी घटनास्थळी भेट दिली.
 
Top