नळदुर्ग -: राष्ट्रवादी कॉंग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी रामतीर्थ (ता. तुळजापूर) येथील माजी सरपंच दामाजी सिताराम राठोड यांची निवड करण्यात आली आहे. नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दामाजी राठोड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय बताले, तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, नळदुर्ग शहराध्यक्ष शफीभाई शेख, अँड. दिपक आलुरे, नगरसेवक नय्यर जहागिरदार, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, समीर मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दामाजी राठोड यांच्या निवडीबद्दल रामराव राठोड, भिमराव पवार, शिवाजी राठोड, सिध्दू कोरे, लालू चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.