बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : चांगल्या दर्जाची सुविधा आणि अल्प दरात उपचार म्हणून जगदाळे मामा रुग्णालय प्रसिध्द आहे. या ठिकाणी एका महिलेची साडेसात किलोची कॅन्सरची गाठ काढण्याची डिबल्कींग शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
     येडशी जवळील गावातील जयश्री कुटे या 46 वर्षीय महिलेला पोटदुखी, पोट फुगणे व श्‍वसनाचा त्रास होत होता. त्‍यामुळे जगदाळे मामा रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. यावेळी सोनोग्राफी आणि सिटीस्‍कॅन केल्‍यानंतर डॉं. कुमार जगताप यांनी अंडाशयाजवळ गाठ असल्‍याचे सांगून यावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. सदरच्‍या महिलेस ह्दयरोगाचा आजार असल्‍याचे तपासणीत लक्षात आल्‍याने शस्‍त्रक्रिया जोखमीची देखील होती. अत्‍यावश्‍यक परिस्थितीमुळे करण्‍यात आलेल्‍या अडीच ते तीन तासाच्‍या शस्‍त्रक्रियेनंतर या महिलेला जीवदान मिळाले आहे. सदरच्‍या शस्‍त्रक्रियेनंतर दोन दिवस आय.सी.यु. मध्‍ये अत्‍यावश्‍यक सेवेत देखरेखीत ठेवल्‍यानंतर सदरची गाठ ही कॅन्‍सरची असल्‍याचे व पुढील केमोथेरपीचे उपचार घेण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे.
जगदाळे मामा रुग्‍णालयात रुग्‍ण्‍सेवेसाठी नव्‍याने दाखल झालेले तसेच
बार्शी तालुक्‍यातील पानगाव हे मुळ गाव असलेल्‍या डॉ. कुमार राम जगताप यांनी पुणे येथील स्‍त्रीरोग व प्रसुतिशस्‍त्र, लॅप्रोस्‍कोपिक सर्जरीचा अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. त्‍यांच्‍या प्रमाणेच डॉ. राहुल मांजरे-पाटील हे देखील कॅन्‍सर तज्ञ, पोटाचे विकार, जनरल व लॅप्रोस्‍कोपिक सर्जन असून औरंगाबाद येथील कॅन्‍सर हॉस्पिटलमध्‍ये एक वर्ष कामकाज केले आहे.
    सदरच्‍या महिलेच्‍या शारिरीक तक्रारीवची व उपचारीची चर्चा झाल्‍यानंतर डॉ. कुमार जगताप यांनी सदरच्‍या रुग्‍णावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय घेतला. संस्‍थेचे चेअरमन डॉ.बी.वाय. यादव यांनी स्‍वतः ऑपरेशन थिएअरमध्‍ये येऊन या जटील शस्‍त्रक्रियेबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. डॉ. राहुल मांजरे यांच्‍याशी सल्‍लामसलत झाल्‍यानंतर भूलतज्ञ डॉ. गायकवाड, इनचार्ज नितीन, श्रीमती पाटील यांच्‍या मदतीने शस्‍त्रक्रिया पार पडली.
    सदरच्‍या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेनंतर डॉ. कुमार जगताप व डॉ. राहुल मांजरे-पाटील यांनी बोलताना सांगितले, ग्रामीण भागातील रुग्‍णांच्‍या सेवेसाठी जगदाळे मामा रुग्‍णालय सदैव तत्‍पर, विविध रोगांच्‍या विभागांसाठी सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्‍टरांचे पथक, अद्ययावत ऑपरेशन थिएटर व मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्‍ध असल्‍याने ग्रामीण भागातील गरजूंना याचा उपयोग होत असल्‍याचे तसेच स्‍व. जगदाळे मामांना अभिप्रेत असलेले सेवेचे कार्य पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न सर्वजण करत असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
 
Top