बार्शी -: येथील युवा संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बार्शी शहर पोलिस ठाणे येथे २६-११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली व पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाजी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त संक्षिप्त भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले.
    पोलीस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके, डॉ. रविंद्र जाधवर, काझी यांनी शहिदांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यात आली. यावेळी शहाजी धुमाळ, अँड. गणेश चव्‍हाण, गणेश जगदाळे, गणेश परंडकर, गणेश शिराळ, मुकेश रामगुडे, मधुरा कुलकर्णी, विवेक गजशिव, फारुख सय्यद, उमेश अडसूळ, शफिक काझी, विक्रम वीर यांच्‍यासह पोलीस मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. याप्रसंगी २६-११ च्‍या हल्‍ल्‍यातील प्रसंगाचे वर्णन करुन भावना व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍या.
 
Top