बार्शी : रमाई घरकुल योजनेंतर्गत बार्शी नगरपरिषद व समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून २७२ घरकुलांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती घरकुल योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी दिली.
बार्शी शहरात यापूर्वी ४३१ मागासवर्गीयांना घरकुले मंजूर झाली व ती पूर्णत्वास आली आहेत. शासनाच्या अनुदानातील दीड लाख रुपये अनुदानामध्ये लाभार्थ्यांनी स्वत:ची रक्कम घालून घरे उभारली आहेत. बार्शी शहरासाठी १२०० घरकुलांचे उद्दीष्ट असून जिल्ह्यासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. बार्शी शहरातील या घरकुल योजनेसाठी पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी विशेष प्रयत्न केले असून राज्याचे राष्ट्रवादी युवक सचिव नागेश अक्कलकोटे, मुख्याधिकारी लांघी, प्रकल्प अधिकारी मायकलवार, समाज कल्याण अधिकारी घाटे, अलकुंटे, अभियंता बामणकर, कस्तुरे, खोडके, रुपचंद कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. घरकुल संघर्ष समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंदोलनात अशोक शेंडगे, राजू थोरात, बाळासाहेब तुपसमिंदर, आनंता बागडे, प्रकाश बगाडे, देविदास बगाडे, राजेंद्र गवळी, निलेश कोटकर, अरविंद वाघमारे, बाळासाहेब कदम, दादा देवकुळे यांनी योगदान दिले आहे.

(मल्लिकार्जून धारुरकर)