पांगरी -: लग्नाचे आमिष दाखवुन एका एकोणीस वर्षिय शालेय विद्यार्थीनीवर अक्कलकोट, तुळजापुर, मैदर्गी अशा वेगवेगळया ठिकाणी वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंद असलेल्या चिखर्डे (ता. बार्शी) येथील आरोपीस अटक करण्‍यात आले आहे.
    दत्‍तात्रय भागवत कोंढारे असे बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. बलात्कार केल्याप्रकरणी व फुस लावुन शरीरसंबंध ठेवण्‍यास भाग पाडल्यामुळे दतात्रय कोंढारे याच्यासह त्याच्या आई, वडील, भाऊ, बहीण अशा पाचजणांविरूदध पिडीत विद्यार्थीनिच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला होता. दतात्रय भागवत कोंढारे असे बलात्कार केल्याप्रकरणी तर लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीसोबत शरीर संबंध ठेवण्‍यास भाग पाडल्याप्रकरणी रागिनी भागवत कोंढारे, सोमनाथ भागवत कोंढारे, सिताबाई, भागवत कोंढारे व भागवत कोंढारे या नातेवाईकांविरूदध गुन्हा नोंद करन्यात आला आहे.
    पिडीत मुलीने पोलिसात रितसर फिर्यादीत आपल्यावर लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार झालेल्या शरीरसंबंधाबात तक्रार दिली होती.शरीरसंबंध ठेवण्‍यास आरोपीच्या नातेवाईकांनी कसे भाग पाडले याबाबत रितसर तक्रारीत नमुद केले होते. बलात्कारासारखा गंभिर गुन्हा नोंद होऊनही त्या प्रकाराची दखल पोलिसांकडुन घेण्‍यात न आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी वरिष्ठांकडे धाव घेतली होती. त्यानंतर तपासाची चक्रे फिरून पांगरी पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top