पांगरी -: घरासमोर थांबण्‍याच्या किरकोळ कारणावरून चिडुन एकाने एकावर तलवारीने हल्ला करून गंभिर जखमी केल्याची घटना कुसळंब (ता. बार्शी) येथे अंबादास शिंदे यांच्या घरासमोर घडली.
    सुरज वसंत ननवरे (वय 21, रा. कुसळंब, ता. बार्शी) असे तलवार हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्याचे नांव असुन सुरज बिभिषण शिंदे असे तलवार हल्ला करणा-या आरोपीचे नाव आहे. जखमी सुरज ननवरे यांने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तो शिंदे यांच्या घरासमोर थांबला असता सुरज शिंदे यांने तु आमचे घरासमोर थांबु नको तु येथुन निघुन जा परत आमच्या घरासमोर रोडवर येऊ नकोस, असे म्हणत तु अजुन घरी गेला नाहीसच का, असे म्हणुन घरात जावुन घरातुन तलवार घेऊन येऊन सुरज ननवरे यांना तलवारीने वार करून गंभिर जखमी केले असे फिर्यादित म्हटले आहे.
    ननवरे यांने दिलेल्या फिर्यादिवरूण पांगरी पोलिसात तलवार हल्ला करूण जखमी केल्याप्रकरणी शिंदे यांच्यावरूदध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
(गणेश गोडसे)
 
Top