पांगरी -: लग्नात राहिलेले दहा हजार रूपये व करनीधरनीचे साहित्य घेऊन येण्‍याच्या कारणावरून नवविवाहीतेचा शारीरीक, मानसिक छळ करून तिला पेटवुन घेऊन आत्महत्या करण्‍यास प्रवृत्त केल्याची घटना बाभळगाव (ता. बार्शी) येथे घडली.
    सौ. लक्ष्मी शाम झोंबाडे (वय 25, रा. बाभळगांव, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव असुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शाम भिमराव झोंबाडे, सासु रकमाबाई भिमराव झोंबाडे, सासरा भिमराव निवृत्ती झोंबाडे यांच्याविरूदध पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
    संजय भगवान खुडे वय 49 रा.लहुजी वस्ताद चौक बार्शी यांनी यासंदर्भात पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. खुडे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, 2008 मध्ये मयत लक्ष्मी हिचा विवाह बाभळगांव येथील भिमराव झोंबाडे यांचा मुलगा शाम याच्याबरोबर झाला होता. विवाहानंतर पतीसह सासु, सास-यांनी माहेरहुन हुंडयातील दहा हजार रूपये व लग्नातील राहीलेले करनीधरनीचे साहित्य घेऊन येण्‍याच्या कारणावरून लक्ष्मी हिचा शारीरीक व मानसिक छळ करून जाचहाट केला. सासरच्या मंडळींकडुन सतत होणा-या शारीरीक, मानसिक छळास कंटाळुन लक्ष्मी हिने रविवार दि. 3 नोव्‍हेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतुन घेऊन आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला होता. 95 टक्के भाजल्याने जखमी अवस्थेत लक्ष्मी झोंबाडे यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
    खुडे यांच्या फिर्यादिवरूण पांगरी पोलिसात तिघांविरूदध जाचहाट करूण आत्महत्या करण्‍यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार हे करत आहेत.
(गणेश गोडसे)
 
Top