उस्मानाबाद : महिला, मुलीवरील वाढत्या छेडछाडीस आळा घालण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे तसेच फायरींगचे प्रशिक्षणाचे आयोजन पोलिस दलामार्फत करण्यात आले आहे.
 
सध्याच्या युगात महिला, मुलींवरील वाढत्या छेडछाडीस आळा घालण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी सचिन पाटील पोलिस अधीक्षक उस्मानाबाद यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध शाळ, कॉलेज, महिला बचत गट, परिचारीका, महिला अ‍ॅडव्होकेट, तसेच विविध बँका महिला पोलिस पाटील तसेच तंटामुक्ती महिला अध्यक्ष, सदस्य त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील महिला, मुलींना स्वसंरक्षणाचे व विविध फायरींगची शस्त्रास्ते व फायरींगची माहिती पोलिस मुख्यालय उस्मानाबाद येथील इंडोअर शुटींग केंद्र उस्मानाबाद येथे दि. १८ नोव्हेंबर रोजी पासून देण्यात येत आहे.
    दि. १८ ते २५ या कालावधीत वरील प्रमाणे एकूण ९०० महिला मुलींना सदरील प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सदरील प्रशिक्षणासाठी अजितसिंग शिंदे, वेपन तज्ज्ञ, रा.औरंगाबाद तसेच सुगरवार, राखीव पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय उस्मानाबाद यांनी चांगल्या प्रकारे शस्त्रांची माहिती देण्‍यात आली. 

    तसेच महिला सहा. कक्ष उस्मानाबाद येथील महिला सपोफौ एम.एस.दामोदरे, मपोनो. अर्चना लोहार, मपोकॉ. राठोड, पोकॉ. सिद्धीकी, डांगे तसेच पोलिस मुख्यालय येथील पोलिस अधीकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे.
 
Top