बार्शी -: पुण्‍याहून लातुर बसमध्‍ये जाण्‍यासाठी प्रवास करणा-या एका 45 वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे.
    बस क्रमांक एमएच 40/9500 ही बस नियमित वेळेनुसार दुपारी सव्‍वा दोनच्‍या दरम्‍यान बार्शी स्‍थानकावर आली. नियमित वेळेनुसार सदरच्‍या बसचे चालक, वाहक बदली करण्‍यासाठी चेकींगचे काम सूरु झाले. यावेळी पाठीमागच्‍या सीटवर एक युवक झोपलेल्‍या अवस्‍थेत आढळून आला. नीटपणे पाहिल्‍यावर सदरच्‍या प्रवाशाची कसलीही हालचाल होत नसल्‍याचे वाहक आर.सी. राऊत व चालक मुंढे यांच्‍या लक्षात आले. सदरच्‍या घटनेनंतर त्‍यांनी वाहन निरीक्षक हांडे यांना सदरच्‍या घटनेची खबर दिली. यानंतर बस थेट ग्रामीण रूग्‍णालयात नेण्‍यात आली. ग्रामीण रुग्‍णालयातील वैद्यकीय अधिकारी करंडे यांनी सदरच्‍या इसमाचा मृत्‍यू झाल्‍याचे पोलिसांना कळविले.
    सदर इसमाजवळ एक काळी बॅग, मोबाईल, मनगटी घड्याळ व धातूची अंगठी इत्‍यादी वस्‍तू जवळ होत्‍या. यावेळी पोलीस अधिकारी फुलारी यांनी केलेल्‍या तपासात मयताची ओळख पटली असून मस्‍सा खंडेश्‍वरी ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद येथील पांडुरंग वर्ते, वय 45 वर्षीय युवक असल्‍याचे निष्‍पण झाले आहे. सदरच्‍या इसमाचा मृत्‍यू नेमका कशामुळे व कधी झाला याचा शोध घेण्‍याचे काम पोलीस करीत आहेत. बार्शी पोलिसांनी अकस्‍मात मयतची नोंद करुन संबंधित पोलिस ठाण्‍याकडे वर्ग केली आहे.
 
Top