उस्मानाबाद :- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान/ स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेअंतर्गत विभागीय आयुक्त, औरंगाबाद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या सयुंक्त विद्यमाने स्वयंसहायता समुह /बचतगट निर्मित वस्तुचे औरंगाबाद विभागस्तरीय, उस्मानाबाद जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री सिध्दा -2014 चे उदघाटन तथा राजमाता जिजाऊ  स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन राज्याचे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, उस्मानाबाद येथे होणार आहे.
    कार्यक्‌रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण राहतील तर प्रमुख पाहूणे म्हणून गृह  राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित राहतील.
    राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहूल मोटे, आ. दिलीपराव देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ.सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, आ. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, ग्रामविकास विभागाचे उपसचिव डॉ. नरेश गीते,  जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सभापती पंडित जोकार, सभापती धनजंय सावंत, सविता कोरे, सभापती दगडु धावारे आदि उपस्थित राहतील.
     तरी या उदघाटन व पुरस्कार वितरण सोहळ्यास बहूसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश बेदमुथा (उपायुक्त) औरंगाबाद, ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबादचे प्रकल्प संचालक केशव सांगळे यांनी केले आहे.    
 
Top