उस्मानाबाद -: जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील युवक-युवतींने सरकारी नौकरीच्या मागे न लागता ग्रामीण भागात जो व्यवसाय चालतो त्या लघु उद्योगाचे संस्थेमार्फत प्रशिक्षण घ्यावे व बँकेकडून कर्ज रुपाने रक्कम घेऊन लघु उद्योग सुरु करावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात स्टेट बँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रशिक्षण इमारत कोनशिला अनावरण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी जी.टी.पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, एस.बी.आय.मुंबईचे मार्गदर्शी बँकेचे सहा.महाप्रबंधक चंद्रशेखर गौशाल, एस.बी.आय. लातूरचे सहा.महाप्रबंधक रघुनाथ लोटे, ,अतिरिक्त्मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे, एस.बी.आय.ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक युवराज गवळी, जिल्हा अग्रणी बँकेचे भिमराव दुपारगुडे, लक्ष्मण सरडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी सर्व सोयीने युक्त अशी इमारत स्टेट बँकेमार्फत बांधण्यात येईल. बॅकेने ठेवी व कर्ज यापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विनामुल्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या खाजगी जागेवर प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. या बँकेमार्फत आतापर्यंत एकूण 30 कोर्समध्ये 850 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे 152 युवक-युवतीं आपल्या स्वता:च्या पायावर स्वयंरोजगार करत आहेत ही बाब कौतूकास्पद आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
लघु उद्योगातील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे कार्यही सर्वांनी करावे. शासकीय योजनेची माहिती नसल्याने अनेक योजनांची निधी परत जात आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी सर्व शासकीय योजनांची माहिती करुन घेऊन योजनेच्या निधीचा वापर स्वयंरोजगारासाठी करावा, असे सांगून श्री. चव्हाण ते पुढे म्हणाले की, छोटे-छोटे लघु उद्योग सुरु करण्यासाठी दुग्धविकास, कुक्कुटपालन व खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजना आहेत त्याचाही लाभ बेरोजगार युवकांनी घ्यावा,असे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर गौशाल यांनी सांगितले की, बँक ही ठेवी स्विकारणे व कर्ज देणे या पुरतेच यांचे कार्यक्षेत्र राहिले नाही तर स्वयंरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे कार्यही बँकेमार्फत केले जाते. दारिद्रय रेषेखालील बेरोजगार युवकांच्या राहणे, भोजन, प्रशिक्षणासाठी बाहेर पाठविणे व अन्य सोयी विनामुल्य युवकांना दिल्या जातात. ग्रामीण विकास यंत्रणेकडून बेरोजगार युवक व युवतींचे बॅकेकडे प्रस्ताव आल्यास ते मंजूर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्हट्टे यांनी साक्षर जीवन जगायचे असेल तर व्यक्तीमत्व विकास काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदास यांनी युवकांनी स्वयंरोजगारकडे वळावे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशिक्षणार्थी वतीने सागर गरड व विलास वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गवळी यांनी केले तर दुपारगुडे यांनी आभार मानले.