उमरगा (लक्ष्मण पवार) -: राज्य परिवहन महामंडळाच्या उमरगा आगारातील एका महिला लिपीकाने कार्यालयात कामावर हजर नसताना हजेरी पटावर स्वाक्ष-या करुन महामंडळाची फसवणूक केल्याची तक्रार विकास गायकवाड यांनी आगार प्रमुखाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमरगा आगरातील कार्यालयात महिला कर्मचारी लिपीक पदावर कार्यरत असून त्या महिलेविरूद्ध प्रथमवर्ग न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आतापर्यंत दि. 10 फेब्रुवारी 2011, 4 मार्च, 19 मार्च, 29 जून, 28 सप्टेंबर, 20 मार्च 2012, 18 जून, 8 ऑगस्ट, 7 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 15 जानेवारी 2013, 25 मार्च, 15 जुलै 2013 या सर्व दिवशी न्यायालयात हजर असल्याचे सांगून या दिवशी त्यांनी कार्यालयातील हजेरी पत्रकावर स्वाक्ष-या करुन कार्यालयातील कोणतेही कामकाज न करता कोर्टाच्या तारखेस हजर राहिले.
वास्ताविक पाहता न्यायालयात न्यायालयीन कामकाजात हजर असताना कार्यालयीन हजेरी पटावर सह्या करुन पगार उचलता येत नाही, असे असतानाही सह्या करुन वरील तारखेचे वेतन उचलले आहेत. यामुळे महिला लिपीकाने राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक केली असून त्यांची वरिष्ठ पातळीवरुन कायदेशीर कार्यवाही करावेत, अशी मागणी गायकवाड यांनी आगार प्रमुखांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रादेशिक विभाग प्रमुख औरंगाबाद, महाव्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, दक्षता व सुरक्षा अधिकारी मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.