परंडा -: सोनारी येथील श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम दि. 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ जन्मोत्सवाची सुरुवात सोमवार रोजी रात्री 12 वाजता गुलाबपुष्पांची मुक्त उधळण करून होत आहे. त्यापुर्वी पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दि. 26 नोव्हेंबर श्री काळभैरवनाथास महाअभिषेक, महानैवेद्य व महाप्रसाद, रात्री 9 ते 12 कीर्तन, बुधवारी सेवेकर्यांना बिदागी वाटप करण्यात येणार आहे. राज्यासह परप्रांतातील भाविकांची काळभैरवनाथ कुलदैवत असल्याने या याठिकाणी मोठी गर्दी होते. चैत्र महिन्यात रथोत्सवास अनेक राज्यांतून भाविक सोनारीत दाखल होतात. चार दिवस ही यात्रा मोठय़ा प्रमाणात भरते. काळभैरवनाथाच्या जन्मोत्सवास भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य पुजारी चंद्रकांत पुजारी, सरपंच दादासाहेब पाटील, उपसरपंच संभाजी सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.