नळदुर्ग : दुकान फोडून गल्ल्यातील रोख रकमेसह इतर ऐवज एकाने लंपास केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड येथे शनिवारी पहाटे घडली.
    याप्रकरणी गणेश गौरीशंकर स्वामी यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले  दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शिवदास रामा साखरे याने २३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या किराणा दुकानावरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोख ४ हजार ५00 व सुमारे ८३0 रुपये किमतीचा किराणा माल लंपास केल्याचेही स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन शिवदास साखरे याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा करण्‍यात आला असून पुढील तपास हवालदार गोविंद पवार हे करीत आहेत.
 
Top