पांगरी -: टॅक्टरच्या पाठीमागील टायरला टेकुन बसलेल्या वृध्‍देच्या पायावरून टॅक्टर गेल्याने वृध्‍देचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी बारा वाजण्‍याच्या सुमारास कारी (ता. बार्शी) येथील खिंडी चौकात घडली.
    यशोदा आपाराव नवले (वय 75, रा. कारी, ता. बार्शी) असे टॅक्टर अंगावरून गेल्यामुळे मयत झालेल्या वृध्‍देचे नांव आहे. अनिल धनाजी कावळे रा.कारी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, कारी येथील खिंडी चौकात असलेल्या श्रीमंत कावळे यांच्या घरास़मोर सदर टॅक्टर उभे असता मयत वृदधा ही टॅक्टरच्या पाठीमागील टायरला टेकुन बसली असता टॅक्टरचालकाने टॅक्टर चालु केल्यानंतर सदर वृध्‍देच्या पायावरून टॅक्‍टरचे टायर गेले. उपचारासाठी नवले यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
 
Top