अंकिता रुईकर
नळदुर्ग : शिकाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणा-या शिकाई असोसिएशन महाराष्ट्र व शिकाई असोसिएशन ऑफ गोवा यांच्या वतीने गोवा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्य पद शिकाई मार्शल आर्ट स्पर्धा 2013 मध्ये नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अंकिता राजशेखर रुईकर हिने सिल्‍वर मेडल पटकाविले आहे.
        गोवा येथील स्पोर्ट क्लब फोंडा येथे नुकत्याच पार पाडलेल्या 14 व्‍या राष्ट्रीय अजिंक्य पद शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातून व 18 किलो वजन गटामधून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कु. अंकिता राजशेखर रुईकर हिने सिल्‍वर मेडल पटकाविला. अंकिता यास उस्मानाबाद जिल्हा शिकाई असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, संगिता पवार, धनराज पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पेशवे, प्रा. शाहुराज घोरपडे, प्रा. कपील सोनटक्‍के, प्रा. विरभद्र स्‍वामी, पर्यवेक्षक प्रा. राजीव कदम आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top