उस्मानाबाद :- माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी स्व. गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सर्वश्री बी. एस. चाकूरकर, के. ए. तडवी, तहसीलदार सुभाष काकडे, राजश्री मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  

आयुर्वेद महाविद्यालयात गांधी यांना आदरांजली
उस्मानाबाद :- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,उस्मानाबाद येथे इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन दि.19 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी  11.30 वाजता साजरी करण्यात आली.
       या महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता वैद्य.पी.डी.डोंगरे, यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन विनम्र अभिवादन केले. व तदनंतर राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ घेण्यात आली.सदर कार्यक्रमास या महाविद्यालयातील व रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारीवृंद उपस्थित होते.            
 
Top