नळदुर्ग : राष्‍ट्रवादीचे महेश बताले यांनी कॉंग्रेस पक्षामध्‍ये प्रवेश केल्‍याने पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी फेटा बांधून पुष्‍पहार घालून त्‍यांचा सत्‍कार केला.
    नळदुर्ग येथील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते महेश बताले यांनी कॉंग्रेस पक्षामध्‍ये प्रवेश केले. अणदूर (ता. तुळजापूर) येथे राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या निवास्‍स्‍थानी महेश बताले यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्‍याबद्दल ना. चव्‍हाण यांनी सत्‍कार केला. यावेळी माजी नगरसेवक सुधीर हजारे, नगरसेवक नितीन कासार, माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर, श्रीकांत माने, ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे अध्‍यक्ष बाबुराव चव्‍हाण, सोसायटीचे माजी चेअरमन दत्‍तात्रय कोरे, सुधीर हजारे आदीजण उपस्थित होते.
 
Top