नळदुर्ग : राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साज-या करतानात्यांचा थोडा तरी आदर्श आपण घेतला पाहिजे, तेंव्हाच ख-या अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी केल्याप्रमाणे होईल, असे प्रतिपादन अणदूर (ता. तुळजापूर) येथील सरपंच माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती, बालदिन, लहुजी साळवे जयंती, राष्ट्रीय मधमुहे दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. सत्यजीत डुकरे हे होते. प्रारंभी पंडीत जवाहरलाल नेहरु व लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. डुकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्रबोध कांबळे म्हणाले की, नुसते राष्ट्रपुरुषांचे स्मरण व्हावे म्हणून जयंत्या साज-या करुन नये. 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढयात हजारो वीर-बहादुरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हजारो राष्ट्रभक्तांनी आपले घरदार सोडून भारतमातेची सेवा केली. तो आदर्श आपण सर्वांनी थोडा तरी आचरणात आणला तर देशाची फार मोठी सेवचा आपल्या हातून होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. सत्यजित डुकरे म्हणाले की, महान राष्ट्रपुरुषांची मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली असून जगातील कोणत्रूाही देशापेक्षा मोठ्या प्रमाणात त्रूात्या क्षेत्रातील दिग्गज राष्ट्रपुरुष आपणाास लाभले, हे आपले भाग्य आहे.
या कार्यक्रमास बसवराज नरे, बालाजी जाधव, नर्सिंग स्कुलचे प्राचार्य हुमायून टेक्कड, साहेब गाौडा, अश्विनी राठोड, संध्या रणखांब, संगीता वरवट्टे, अश्विनी जाधव, रेश्मा भालेराव, कविता राठोड, आम्रपाली गायकवाड, अश्विनी कुंभार, अंजना गायकवाड, सागर निकंबे, यास्मिन फकीर, रेखा मोरे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रसन्न कंदले यांनी केले.