बार्शी : भारतीय संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी महिलांनी ङ्कर्यादेचे भान राखावे, स्त्रीयांची जबाबदारी अधिक तसेच कुटूंबातील प्रत्योकाने एकमेकांचा मान राखून नात्यातील ओलावा जपला पाहिजे असे मत अँड्.अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.
    बार्शीतील पाटील प्लॉटमधील स्थानिक रहिवाशी मंडळाने आयोजित केलेल्या चला नाती जपूया या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अशोक डहाळे, प्रमुख पाहुणे विनयभाई संघवी, मार्गदर्शक अविनाश सोलवट, अध्यक्ष संताष ठोंबरे, सिध्द समाधी योगच्या सुषमा हंचाटे, ब्र.कु.संगीता बहन आदी मान्यवर उपसिथत होते.
    अपर्णाताई पुढे म्हणाल्या, मोठ्या शहरातील मुली हरवण्यांच्या तक्रारी वाढत आहेत. भारतीय संस्कृतीची मृत्यूघंटा वाजत आहे, कायद्याचा गैरवापर होण्याचे प्रङ्काण वाढत असून कुटूंब व्यवस्थाही ढासळत चालली आहे. माणूस शिकला हे खरे असले तरी तो त्याबरोबरच सुसंस्कृत होत नसल्याचे दु:ख आहे. आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी सर्व चुकांना जबाबदार आईलाच धरले जाते, मुलगी ही वडिलांची श्वास, विश्वास, मर्यादा, प्रतिष्ठा अन सन्‍मानही असते त्यामुळे मुलींनीही जबाबदारीने वागायला हवे. त्याचे ज्ञानही आईनेचे मुलीला दिले पाहिजे. परंतु दुर्देवाने या गोष्टीचे भान आईलाच राहिले नाही. घराचा उंबरा शाबूत ठेवा असे सांगत समाजात वावरतांना डोक्यावर बर्फ अन तोंडात साखर ठेवणे गरजेचे आहे. इतरांच्या आनंदासाठी जगायला शिका असा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला.
   
    आपण वकीलीलची सनद घेतली तरी कोर्टात आलेल्या अनुभवाने पैशासाठी वकीला करणे नाही असे ठरविले. मागील तेरा वर्षांत आपल्याकडून ९८५ स्त्रियांचे संसार तडजोडीने आनंदाने नांदते केले. हे करतांना पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या चुका अधिक असल्याचेही प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी सांगीतले. ङ्कुलीच्या संसारातील आईची ढवळाढवळ चिंतेची बाब असून हे थांबणे गरजेचे आहे पुरुषांच्‍या सर्वच नात्यांना व्यवस्थित न्याय द्यायला हवा असे सांगत घराला घरपण आणायचे असेल तर पुरुषांची आदरयुक्त भीती घरात असायलाच पाहिजे. मुलींच्या तोकड्या कपड्यांबद्दल नाराजी व्यक्त करत हेच संस्कृती ढासळत चालल्याचे लक्षत आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा झाल्यानंतर दहा लाख पुरुषांच्या आत्‍महत्या झाल्या. शुल्लक गोष्टींवरुन नात्यांची वाभाडी काढून कोर्टात जात आहेत यामुळे नाती तुटत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत सङ्कजुतदारपणे वागल्यास ही वेळच येणार नाही. सानेगुरुजींना अभिप्रेत असलेल्या शाङ्कची आई या संकल्पना मोडीत निघत असून शाम रेव्ह पार्ट्यात तर आई टिव्हीपुढे बसून मालिका बघण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. धर्मशिक्षण संकल्पना मोडीत निघत असून हे कोण शिकवणार असा प्रश्‍न उपस्थितझाला आहे. संस्कृती टिकली पाहिजे यासाठी आयांनो जिजाऊ व्हा, सावित्रीबाई व्हा असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
    यावेळी विनय संघवी, सुषमा हंचाटे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रताप जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले. अविनाश सोलवट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास तिकटे, कवि प्रकाश गव्हाणे, सतिश गोडसे-पाटील व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top